स्त्री शक्ती
स्त्री शक्ती
जग दाखविले आम्हासी, अनमोल हा जन्म देऊनी न फिटे उपकार माये, जन्म जरी घेतला फिरुनी
हसुनी मागे टाकले ,आयुष्यातील सारे दुःख किती दाह सोसले या देहाने, परि ना मिळाले सुख
पिल्लांच्या भविष्यासाठी केवळ, झिजउनी आपली काया परी पुरी हयात गेली सरुनी, जन्म गेला न वाया
स्वाभीमानाने जीवनासी, गेली सामोरी खरोखरी या जन्मी कोणतीच, इच्छा न ठेवली अपुरी
जायचीस तू सोडूनिया, आपुल्या पिल्लांना घरी लक्ष न लागतसे तुझे केवळ, आपल्या सानुल्या वरी
कधी ना दिलासी तू ,दोष नशीबाला कर्म करत रहाणे हा, जपला वसा आपुला
हात हाती घेऊन, लावले वळण आमच्या मना देऊनी शिदोरी संस्काराची, संस्कारित केलेस जीवना
सारा देह झिजवलास, केवळ आमच्या पायी माये तुझ्या ऋणात राहुनी, न होणे उतराई
