STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Inspirational

4  

Abasaheb Mhaske

Inspirational

चल उठ लवकर

चल उठ लवकर

1 min
28.9K


सांग कविते ... तुला मी काय म्हणू?

शाप म्हणू की उ :शाप म्हणू

की नसते उपद्व्याप म्हणू

सांग कविते ! तुला मी वरदान म्हणू?

रात्र -रात्र छळतेस , दिवसाही पिच्छा करतेस 

अस्वस्थेचे ढग कायम मनात रुजवतेस ...

खरं - खरं सांग कविते का मला छळतेस 

नकोसे स्वप्न सारे का उगाच दाखवतेस?

जखम ओली का पुन्हा ताजी करतेस?

तिची खपली पुन्हा नव्याने भळभळते...

काय केला गुन्हा मी, त्याची शिक्षा देतेस?

सांग कविते ! कुठला सूड उगवतेस

माझं दुःख मला ठीक आहे पण...

दुसऱ्याचहि दुःख बहाल करतेस?

मी काय तुला धान्यच कोठार वाटलो?

मी हि शेवटी माणूसच ना ? सोड की पिच्छा

खरं सांगतो कविते! जगणं आता अश्या झालंय 

सावलीसारखी तू नेहमीच सोबत असतेस ...

दुसरे व्याप काय कमी आहेत ? त्यात तुझीही भर 

निघून जा जीवनातून .. चल चालती हो आधी 

क्षणभर वाटत बार झालं, सुटलो बाबा एकदाचा 

सुटकेचा निःश्वास सोडतो तर.. तू पुन्हा हजर 

वाकोल्या दाखवून अंतर्धान पावतेस कधी...

झोपेतून घडबडूंन जागे करतेस पुन्हा? 

स्वप्नात येऊन म्हणतेस कशी ,छळत नाही रे तुला!

जाणीव करून देते अंधःकार पसरलाय चोहीकडे .. 

कुणी तरी प्रकाशाचं बेटं उभारायला हवं, तुझ्यापासून सुरवात समज 

जागा हो, प्रकाशमान हो आणखी ठिकाणीही जायचंय मला चल उठ लवकर .. 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational