STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational Others

5.0  

Pandit Warade

Inspirational Others

आई

आई

1 min
28K


.      आई

आई घराचं पावित्र्य

आई घराचं मांगल्य

आई प्रेमाचा उमाळा

आई ईश्वरी वात्सल्य


आई घरात असता

येई घरा घरपण

देई चैतन्य उभारी

तिचं हासून बोलणं


आई अनुभव शाळा

साऱ्या घराचं शिक्षण

आई बाळाला घडवी

आई संस्काराची खाण


रात रात जागुनिया

आई करिते सांभाळ

कोणी पुसते का कधी

तिच्या जीवाची आबाळ


आई गर्भाच्या कुशीत

नऊ मास वागविते

स्वतः त्रास घेऊनोया

मोठ्ठं बाळाला करते


आई संचय सुखाचा

आई मायेचा सागर

आई समीप असता

दूर दुःखाचा डोंगर


आई समईची वात

किती जळते जळते

नसे घरामध्ये तेव्हा

तिची महती कळते


हात जोडून विनंती

देवा नारायण तुला

नको ठेऊ आईविना

जगी कुणाही बाळाला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational