STORYMIRROR

Pallavi Wagle-Samant

Inspirational

4  

Pallavi Wagle-Samant

Inspirational

'प्रिय स्वातंत्र्य'

'प्रिय स्वातंत्र्य'

1 min
26.8K


पारतंत्र्याच्या टापूत होती असंतोषाची ढास

तेजोमय रूपाने आणलीस जागृतीला आस

असहकाराला आला सामर्थ्याचा साज

सविनयाने घेतली नाविन्याची बाज

अस्मितेने धरले जसे गोंडस बाळसं

चिरस्थायी मातीत भिजून गेली माणसं

सरत गेले कित्येक क्षण सरत गेला काळ

स्वानंदाची नाही घालत कुणीच आता माळ

पंचतारांकीत स्वप्नांमध्ये भरारी ज्याची त्याची

अविचाराने धरली काजळी जणू दिव्यत्वाची

रूढी, परंपरांचा वणवा अजूनही पेटता

हत्या, दंगल, स्फोटातून राखेला रस्ता

तंत्रयुगाच्या काळामध्ये घडत गेले जलद

ऐच्छिक सुखांच्या पलीकडे आयुष्य झाले गडद

वाटते कधी भय व्याकुळ होते मन

जपतील ना सारे तुझे हे जमवलेले धन ?

मी मात्र जपेन तुझा मोकळा श्वास

कोडग्या वृत्तीला आणेन उन्मेषाचा ध्यास

देते अशी ग्वाही तुझा मांडेन थाट शाही

विनवणी तेवढी एकच सदा घालत रहा शीळ                                               

निर्मळ होईल असा गच्च धरून ठेव स्वातंत्र्याचा पीळ.

तुझीच देशसेवी.

वंदे मातरम I


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational