STORYMIRROR

Pallavi Wagle-Samant

Others

2.6  

Pallavi Wagle-Samant

Others

मुलगी झाली हो....बापाने मुलगी

मुलगी झाली हो....बापाने मुलगी

1 min
53K


मुलगी झाली हो....

पापणी नव्हती हलत चाहूल आरोळीची

जन्माला आलीच ती माझी अमरभूपाळी हो

आनंदाने सांगतो मला मुलगी झाली हो....

अंगणातील ही तुळस वृंदावन कुंपणावरची वेल

गंधाने बहरली माझ्या जीवनाची सृष्टी हो

प्रसन्न झालो मी मला मुलगी झाली हो....

झपझप पाऊलांनी वाटेकडे लावेल माझे डोळे

डाळिंबाचे ओठ तिचे इवलाले हात खांद्यावर ठेवेल हो

भारावून गेलो मी मला मुलगी झाली हो....

आणेन तिला भातुकली बरोबर तिचीच छबी

भावलीसोबतच्या गप्पांमध्ये हळूच कानोसा घेईन हो

जिव्हाळ्याने सांगतो मला मुलगी झाली हो...

लादणार नाही तिच्यावर माझ्या स्वार्थी इच्छा

वल्ह्णत तिचा नावाडी देईन माझ्याच सदीच्छा

आत्मीयतेने सांगतो मला मुलगी झाली हो....

नको विचार कन्यादानाची नकोच ती घाई

मानवतेच्या संस्कारांचा हाती जुडगा ठेवेन हो

तेजोमय झालो मी मला मुलगी झाली हो....

आयुष्याला दिला हिनेच नवा आकार

नादमय दैनंदिनीची सुरेल बासरी मिळाली हो

तन्मयतेने सांगतो मला मुलगी झाली हो....


Rate this content
Log in