पालवी
पालवी
हो मंत्रमुग्ध सखी आलाच तो गारवा
करते ही पालवी आता आर्जवा
गेला तो दिवस पानझडीचा
आला तो सुकाळ सूचीचा
घे बहर सौख्याचा
झोका घे तन्मयतेचा
नको आठवण फक्त साठवण
भूतकाळाची नकोच ती लागण
वर्तमानाची उभी कर सावली
सांगते तुझीच होऊन माऊली
आहेस तू किरण आहेस तू अक्ष
तुलाच घडवायचाय हा कल्पवृक्ष
उसळू दे तुझ्या ओठांची लाट
तेव्हाच येईल जगण्याला खळखळाट
बस.... आता कर तुझे तूच जिणं सार्थ
घडेलचं तुझे जीवन कृतार्थ ......
मोकळ्या विश्वात अनोखे तुझे वावर
सोनेरी पाऊलांनी तुझ्याच क्षितिजाला एक नवी प्रहर
