STORYMIRROR

Rajesh Sabale

Inspirational

1.3  

Rajesh Sabale

Inspirational

पाऊस

पाऊस

1 min
29.6K


येता पावसाची सर, गंध मातीचा सुटला।

थेंब, थेंब,पावसाचा तिच्या गर्भात साठला।।धृ।।

 

अस अवचित कसं बाई, पावसाचं येणं।

जसा प्रीतीचा सुगंध, कळी फुलात राहणं।।

काय त्याची लीला, सारा नियतीचा खेळ।

असा अवचित येतो त्याला नाही काळ वेळ||

कसा वादळ-वाऱ्यान, त्याला कवेत घेतला|  

आसुसल्या प्रीतीसाठी, नभी पाऊस मातला।।१।।

 

येता आभाळ भरून, नभ काळ निळं झालं।

सर पावसाची येता, सारं शिवारं भिजलं।।

फुलारून गेली काया, धरणी मनात लाजली।

रानवेलं झाडामागे, उभी राहून हासली।।

धुंद झाली वनराई, मळा फुलांनी सजला।

बीज अंकुरण्यासाठी, दाना मातीत निजला।।२।।

 

मेघ दाटता आकाशी, जसे वऱ्हाडी जमले।

शेतकऱ्याच्या मुलीचं, जणू लगीन ठरले।।

हिरवीगार झाली शेती, वनराई गं फुललं।

जणू प्रेमाच्या मळ्यात, अशी न्हाऊन निघलं

गंध मातीचा सुटला, जणू मोगरा फुलला।   

जसा मोकळ्या केसात, कोणी गजरा माळला।।३।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational