उन्हाळा (वैशाख वणवा)
उन्हाळा (वैशाख वणवा)
या गं वैशाख मासात,
ऊन तापत गं लई|
अंग घामान भिजता,
येते सावलीची सई||
होता उमारा घामारा,
झाली काहिली अंगाची|
बिन पानाच्या झाडाला,
फुटे पालवी उन्हाची||
काय नियतीचा खेळ,
पान्हा फुटे गं झाडास|
झाड वेली सुकल्या गं,
तरी कोंब फूट त्यास||
शेत नांगरून पाही,
वाट येईल पाऊस|
डोळे वटारून जाई,
आग ओकीत दिवस||
नाही झाडाला पालवी,
नाही वेलीला सावली|
भर उन्हात तापते,
शेतकऱ्याची माऊली||