विवाह (नव्या नवरीच मन)
विवाह (नव्या नवरीच मन)
नव्या नवरीच मन, वाऱ्यावर कसं फिरलं।
जसं ओल्याचिंब, पावसात मन भिजल।।धृ।।
जमलं लगीन मुलीच, मन हे कावर बावर।
जस शेळ्या मेंढ्यांचे, कोकरू रानात वाबर।।
काय विचार मुलीच्या मनात, मळभ दाटल।
जसं नभात घन हे आकाशा अंगणी वाटलं।।१।।
नवरा उधळीत येईल कसा, मातीचा गुलाल।
जसं भिजल्या केसात, रोमांच अंगी फुलाल।।
आई-बापाची माया, सरून माहेर भूलल।।
जणू नवरीच्या मनात, सासर आता फुलल।।२।।
आई-बापाच्या डोळा पाणी, मनात काहूर।
जाता नांदाया मुलगी, फुटे हा मायेचा पाझर।।
झालं लगीन मुलीच, डोळ ही पाण्यानं भरलं।
आलं आभाळ भरून, पाऊस अंगण भिजल।।३।।