STORYMIRROR

Rajesh Sabale

Inspirational

3  

Rajesh Sabale

Inspirational

अभिमान मराठीचा

अभिमान मराठीचा

1 min
205

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त

 यनिमित्ताने माझी ही स्वरचित रचना...

 अभिमान मराठीचा

 महाराष्ट्र राज्य माझे, माझी भाषा आहे मराठी

 अभिमान तिचा मला मी, रोज बोलतो मराठी ॥


 जन्मापासून ऐकत आलो, माऊलीचे बोल

 जळता कांडता माय माझी, मराठीत बोल

 बापाचे बोट धरून शिकलो, मराठीचे बोल

 शाळेत शिकवताना गुरुजींही,मराठीत बोल

 घरी बोलतो आम्ही, साधी भोळी मराठी

 अभिमान तिचा मला, मी रोज बोलतो मराठी ॥


 भाषा अलंकारी तीचा, गोडवा लाई भारी

 शेतामध्ये गातोय शेतकरी, रोज तिची भलरी

 पंढरीचा वारकरी भक्त, मराठीतच गायी

 साथ अभंगाची देण्या, टाळ मृदुंगाची घाई

 कथा कीर्तनी अभंग गाती, भक्त संतांचे मराठी

 अभिमान तिचा मला, मी रोज बोलतो मराठी ॥


 मायबोली माझी मराठी, तिला अमृताची गोडी

 सोडा इंग्रजीला आता, बोला मराठी थोडी थोडी

 तिच्या संस्कार संस्कृती न्हालो, झालो आज मोठा

 नाव मराठीचे घेता आम्हा नाही कसला तोटा

 शाळा इंग्रजीची दारी तरी, तरी मी बोलतो मराठी

 अभिमान तिचा मला मी रोज बोलतो मराठी ॥



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational