STORYMIRROR

Rajesh Sabale

Tragedy

3  

Rajesh Sabale

Tragedy

नायक (कान्हा)

नायक (कान्हा)

1 min
169

कडी कुलपात बंद, तरी माय-बापा तारी।

वासुदेव देवकीचा पुत्र, नंद यशोदेच्या घरी।।


दही दूध लोणी चोर, रानी गाई गुरं चारी।

वाट आडवून कधी, खोडी गवळणीची करी।।

वाढला अत्याचार फार, मामा कंसाच्या नगरी।

जन्माला बहिणीच्या पोटी, भावाचा मारेकरी।।

तोच नंद-यशोदेचा कान्हा, करी गोकुळात चोरी।


त्याच्या बासुरीच्या सुरात, लोक वेडी झाली सारी।

पशु पक्षी रानामधी गाऊन नाचे गोधन पोर पोरी।।

चेंडू लगोऱ्याचा खेळ चाले, यमुनेच्या तीरी।

कालिया नागाला तो खेळता खेळता मारी।।

कोणी म्हणे यशोदेचा पोर, दही दूध चोरी।


नाना विधी खेळ त्याचे, नाना विध चाळे करी।

नेम धरून फोडीतसे, तो डोईवरल्या घागरी।।

ओलेचिंब भिजलेली गवळण येई नंदाच्या दारी।

तर तिच्या आधी कान्हा उभा, यशोदेच्या घरी।।

कसं सांगावं यशोदेला, कान्हाची चावट गिरी।


तोच चक्रपाणी होता, तोच सखा राधा गवणीचा।

गरीब सुदम्याच्या मित्र, होता रथसारथी अर्जुनाचा।।

होता दौपदीचा बंधू, वस्त्र पुरविणारा राजा द्वारकेचा। 

घडविले महाभारत त्यानं, केला उद्धार जगताचा।

असा खोडकर खट्याळ, कर्दनकाळ नटखट मुरारी।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy