STORYMIRROR

Rajesh Sabale

Drama

3  

Rajesh Sabale

Drama

मुले (उत्सव)

मुले (उत्सव)

1 min
172


निळ्या आकाश अंगणी,

वाजे नौबत कशास|

निळ्या सावळ्या पोरांनी,

केला उत्सव झकास||


पडे डफावर थाप,

तसा झाला कडकडाट|

विजा लागल्या नाचाया,

वारा धावला सुसाट||


दम दुमले आकाश,

साद भुई वर आली|

साद एकटाच कानी,

मुल मनी आनंदली||


आला रे पाऊस,

चला झेलू या रे थेंब|

सारे भिजून जावू या,

सारे होवू ओले चिंब||


मन मोकाट धवू द्या,

पावसाच्या थेंबा संग||

फेर धरून नाचू,

या वेळी फुला संग||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama