स्वप्न पाहिले मी
स्वप्न पाहिले मी


स्वप्न पाहिले मी आई
या जगात यायचे
तुझ्याकडून माझे सारे
लाड पुरवून घ्यायचे
पण आता अस वाटतं
ते नाही पुर्ण होणार
माझं आयुष्य
गर्भातचं संपून जाणार
का करतात गं आई
मुलगा मुलगी भेद
एखाद्या चिमुरडीचा जीव
घेताना वाटत नाही का खेद
माहित आहे मला
तू ही आहेस हतबल
मागणे आहे एक
फक्त एकदा हे
जग पाहू दे
नऊ महिने सुरक्षित
मला गर्भात राहू दे
बनून झाशी
तुलाचं करावी लागणार आहे
लेकराची सुरक्षा
धैर्याने बदलून टाक
भुरसटलेल्या विचारांची कक्षा
असं ऐकलयं मी
सगळं ऐकतात बाबा तुझं
चल तर मग आज
हट्ट करुन माग आयुष्य माझं
चल ठरलं तर मग
तुझ्या विश्वासावर
पाहणार मी हे सुंदर जग
मी आता आई आहे निर्धास्त
ठेऊन गोड आशा मनी
मिळेल मला हे जग पहायला
त्यासाठी असेन मी तुझी
आयुष्यभर ऋणी