गुरु म्हणजे
गुरु म्हणजे
1 min
14.3K
आयुष्यरुपी पुस्तकातील
सुवर्ण रुपी पान म्हणजे गुरु
ज्यामुळे मानवी आयुष्य
खरचं लागतं तरु
गुरु म्हणजे
ज्ञानरुपी आकाशातील होकांयत्र
जे देतात आपल्याला
जीवन जगण्याचा मंत्र
गुरु म्हणजे
शालेय मंदिरातील पुजारी
विद्ववत्ता पाणी भरते
ज्याच्या दारी
गुरु म्हणजे
सतत नाविन्याचा शोध
प्रत्येक क्षणाला
प्रयोगशिलतेचा बोध
गुरु म्हणजे
कधीही न थकणारं यंत्र
जे कर्तव्य, शिस्त,आदर
नम्रता आणि उत्साही पंचतंत्र
