अनाथांची दिवाळी
अनाथांची दिवाळी
आज घरोघरी सर्वांच्या दिवाळी
सांगा कशी असेल
त्या अनाथांची दिवाळी?
अनाथ बिचारे कोणाकडे
करतील फटाक्यांसाठी हट्ट?
गरीबी बांधलीयं त्यांच्या
पदराला घट्ट
जुने- पाने वस्त्र
ते परिधान करतात
राहिलेले शिळे अन्न
खाऊन पोट भरतात
कशाचे आले फटाके
अन् कशाची रोषणाई
प्रत्येक इच्छा त्यांची
स्वप्न बनून राही
अनाथांनां देऊन जुनं-पानं
लोक मोठेपणा गाजवतात
आपलं नाव समाजसेवकांच्या
यादीत सजवतात
श्रीमंताच्या मुलांचे
वाढदिवस आश्रमात
खरचं का आत्मियता
असते तेवढी मनात?
'आश्रम' नावाच्या घरात
ते कुढत- कुढत जगतात
काही नाही फक्त अन् फक्त
पोटभर अन्न मागतात
अशा अनाथांचा स्वीकारुन
थोडा शिक्षणाचा भार
करा थोडा त्याच्या
जीवनाचा विचार
फक्त दिवाळीलाचं
नको त्यांची आठवण
रोज मिळावे त्यानां
पोटभर सकस अन्न
म्हणून हवा प्रत्येकाचा
त्याच्यांसाठी मदतीचा हात
अनाथांची ही असेल
दिवाळीची सोनेरी सुप्रभात
