STORYMIRROR

Ashvini Dhat

Tragedy

3  

Ashvini Dhat

Tragedy

एकटेपणाची दिवाळी

एकटेपणाची दिवाळी

1 min
13.1K




पूर्वी अंगणी

बाळ- गोपाळ खेळायचे

त्यानां आवरता-आवरता

घामाचे थेंब गळायचे


शिकून- सवरुन त्यांनी

परदेशाची वाट धरली

माया ममता सारी

पैसा-प्रतिष्ठेत विरली


पाखरं सारी उडाली

जीवनाच्या संध्याकाळी

एकटेपणाची दिवाळी

आज आमच्या भाळी


दूरुनचं वाहतात

काळजीचं आझं

आधुनिकतेच्या पसाऱ्यात

लुप्त कुटूबं माझं


नाही फटाक्याचा आवाज

नाही फराळाचा सुगंध

लेकरं नाहीत जवळ

आयुष्यात कसला गंध?


आता नाही उरली

दिवाळीची मजा

मायेची माणसं झाली

आयुष्यातून वजा


जीवन सरलं

कष्ट करुन

दसरा-दिवाळी येता

एकटेपणाने डोळे येतात भरुन


अशी आहे आज

एकट्या आई-वडिलांची व्यथा

सांगायला सुरुवात केली तर

संपणार नाही कथा




Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy