STORYMIRROR

Ashvini Dhat

Inspirational

4  

Ashvini Dhat

Inspirational

स्वप्न

स्वप्न

1 min
25.2K


स्वप्न मला एक पडले

स्वप्नांत आज अवचित घडले

भारत झाला म्हणे

भ्रष्ट्राचार मुक्त

स्वच्छतेचे कायदे

आता झाले सक्त


स्त्रीयांचा होऊ लागला

इथे सन्मान

मुलीच्या जन्माचे

होऊ लागले गुणगान


नाही उरला इथे

आता जातीयतेचा तंटा

प्रत्येकाच्या मनात

वाजतेय माणुसकीची घंटा


नैसर्गिक साधनसंपत्तीचा

करतोय जपून वापर

नाही फोडत आता

आपल्या अधाशेपणाचं

निसर्गावर खापर


मुलांनच्याआवडी निवडीला

मिळतोय भरपूर वाव

घातला जात नाही

त्यांच्या बालपणावर घाव


नाही दिसलं आंदोलन,

रास्तारोको, बंद

सर्वत्र पसरलायं शांततेचा गंध



प्रत्येक नागरिक इथला

बनलायं आता शूर जवान

ठेऊन मनी आपल्या

कर्तुत्वाची जाणं


असं सुंदर होतं स्वप्न माझं

मनी एवढीचं इच्छा

व्हावं ते पूर्ण

काळ असेल भारतासाठी

तो सुवर्ण, तो सुवर्ण


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational