STORYMIRROR

Ashvini Dhat

Fantasy Others

3  

Ashvini Dhat

Fantasy Others

क्षण सोनेरी.. भाऊबीज

क्षण सोनेरी.. भाऊबीज

1 min
14.2K




काढून भाऊराया

दोन दिवसाची सवड

केली माहेरी यायला

भाऊबीजीची निवड


पहिल्यासारखी नाही रे

आता मी मुक्त

दोन दिवसात ये

अशी ताकिद केली सक्त


हे दोन दिवस असतात

माझ्यासाठी सोनेरी क्षण

वाट दिवाळीची पाहते

माझे आसुसलेले मन


मोठ्या मनाने

आशिर्वाद तुज देईन

दोन शब्द तुझे गोड

ओवाळणी मानून घेईनं


अशी भाऊबीज

सर्व बहिणींसाठी असे न्यारी

सुखाची शिदोरी घेऊन

परत येतात आपुल्या घरी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy