STORYMIRROR

Radhika Chougule

Fantasy

4  

Radhika Chougule

Fantasy

पाऊस पाऊस आणि पाऊस

पाऊस पाऊस आणि पाऊस

1 min
42.5K


वैशाखातला तहानलेला तू..

अनपेक्षितपणे येऊन जात

माझ्यातल्या तृष्णेची जाणीव करुन देणारा..


ज्येष्ठातला वळवाचा हळूवार तू ..

माझ्या चातक जीवाला आस लावणारा..


आषाढातला धूवांधार तू..

मुसळधार मुसंडी मारत

जिवापाड जिव्हाळा जागवणारा..


श्रावणातला खट्याळ तू..

सूर्यासोबत फुगडी घालत

ऊबदार थेंबांनी थोपटणारा..


भाद्रपदातला हळवा तू..

निरोपाची घटृ मिठी देत

डोळ्यातून हलकेच निसटणारा..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy