Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

प्रमोद राऊत

Fantasy

3  

प्रमोद राऊत

Fantasy

पावसातील चहा

पावसातील चहा

2 mins
161


धुंद होती धूसर धुक्याची चादर

लहर होती शीत पसरलेल्या गवतावरं

दवबिंदू पसरून गेले होते झुळूक वाऱ्याची

न कळत येऊन गेली कानशिलास खेटून

डोळ्यासमोर सोनेरी किरणे होती रंग बदलत

येणाऱ्या सूर्यनारायनाचे आविष्कार बघत


सहज वाटलं हळूच मागे फिरावे पण 

नकळतपणे पहाटेच स्वप्न आठवलं कालच्या प्रवासात

होता सहवास तिचा निसर्गाच्या सानिध्यात मस्त

फिरत होतो केरळच्या मुन्नार मध्ये जणू स्वर्ग होता

पृथ्वीवर त्यात भरभरून भरलेलं निसर्ग सौंदर्य

त्यात भेटलेला माझा तो चंद्र सहवास अजून मंद सुगंध।

कालच्या दिवसात आठवणी जाग्या करीत आहे

पण काल हा काळ होता आज नवा उष्काल आहे

नाही विसरता व्हायचे पुढे कालचा दिवस म्हणजे एक


अविस्मरणीय आठवणी च गाठोडं जिथं नतमस्तक होतं मन

कसं खुश होत स्वैराचार नव्हता फक्त स्वतंत्र दोन

एकत्र आले येण्यासाठी साथ मिळाली त्या निसर्गाच्या सानिध्यात

परत जवळ होऊन एक मात्र घडलं मन जुळलं

डोळ्यांनी काय माहित काय पाहिलं पण नक्की

ठरलं थेट अंतःकरण एकत्र झालं निवड झाली अन्

मनातलं सगळं सगळं खरं सांगायला सुरुवात झाली


हू ह हा हा असे शब्द सुरू झाले

त्यात हलकेच लाजून खाली बघणं 

नजर चोरून बघणं नकळतच सहज स्पर्श झाला

शहारून गेलं अंग त्यात आले पावसाचे थेंब

केली त्यांनी लगबग मग काय सवरायच घाई झाली

आडोसा शोधला त्यात त्यानं खूप दहशतवादी हल्ला केला

गडगडाट केला ओरडून ओरडून भीती घेतली


आणि आडोसा मिळाला की मग ओले अंग साफ केले

छान मातीचा सुगंध दरवळत होता त्यात शब्द सुचले

अबोला संपला सुरू झाली गप्पांची मैफिल

मग असा तो वेडा पहिला पाऊस कधी आला कसे भिजलो काय काय

अनेक घटनांचा इतिहास वाचून झाला नकळतपणे


दिवस मावळतीला गेला खूप खूप वेळ गेला

त्याचा जोर कमी झाला सहज नजर बाहेर गेली तर थोडा धूर दिसला

तिथं गेल्यावर छानसा चहाचा वास आला

मग नको कोण म्हणेल हाच होता तो रोज पितो घरी पण आजचा प्रेमाचा चहा

काय माहीत किती गोड होता कप छोटा होता गरम होता पण संपवून टाकायचा नव्हता


हळूहळू घेतला घोट आवंढा गिळत शब्द आले

कसा आहे भानच हरपले हो की पण कोण कसा आहे चहा की मी

उहह मी मस्त झकास नाही रे बाबा तो तू घेतोय ते चहाचं विचारलं

हहह हू तो आहे की मस्तच गोड 

गरज होतीच त्याची त्यावेळी मिळाला

पण आजचा मात्र तो खूप वेगळा आहे

न विसरणारा त्याला आठवणीत राहील असा 

असे कसे आठवणीत राहील म्हणजे रोज घेतो

पण आज मात्र खास कोणीतरी सोबत आहे

त्यांच्या सहवासात घेत आहे त्यात एक वेगळा गोडवा आहे


हो का मग काय काय आहे त्यात

गोडवा असायला काय वेगळी साखर आहे की काय

नाही तस काही पण गोड गोड व्यक्तीचा सहवास असल्याने

त्याची गोडी अवीट आणि अविस्मरणीय आणि त्यात पाऊस आणि

हा वेडा भरलेला हिरवा निसर्ग खळखळून वाहणारे नदी नाले ओढे 


हे तर असेल पण माहीत नाही

किती वेळेसाठी असतील ह्या सुखद आठवणी

पण भाग्यवान असेन मी ह्या पण सुखाने बहरून गेलो

ओढ असेल ती पुन्हा पुन्हा अश्या सुखाच्या क्षणाची

चल हट असे सारखे नसते माहीत

नाही असेल भाग्यात तर होतील ह्या आठवणी परत जाग्या

नाही तर एक संस्मरणीय प्रवास समजून घेणे


Rate this content
Log in