बलिदानाने पावन केलं स्वातंत्र्य
बलिदानाने पावन केलं स्वातंत्र्य
तो दिवस होता
नुकताच पावसाळा संपत आला होता
एक आव्हान होतं
देश स्वतंत्र करण्यासाठी
हाती झेंडे घेतले होते
मग अगोदर लहान पुढे
मोठ्या हौसेने होते
स्वातंत्र्य का अन् कशाला घ्यायचं होतं
प्रवास हा कुठं निघाला होता ते माहीत नव्हते
वडगाव औंधहुन सगळे
अति आनंदात-जोशात
चले जाव म्हणत वडुजला पोहोचले
तारीख होती नऊ
गर्दी झाली तहसीलदार कार्यलयावर
घोषणाबाजी सुरू झाली
त्यात ताण वाढले
मग त्या प्रश्नाचे उत्तर शोधून काढले
आतून आदेश दिला की
क्षणात गोळीबार झाला
९ हुतात्मे धारातीर्थी पडले
सगळे बाकीचे धावले सैरावैरा
बिचारा परशुराम मात्र
हातात झेंडा घेऊन पडला
भारतमातेच्या कुशीत त्याने
चले जाव चले जाव म्हणत प्राण सोडला
जय हिंदचा नारा सुरू झाला
स्वातंत्र्य भोगतो आम्ही पण दुःख नाही पुसले
हुतात्मा परशुराम यांच्या
मातेचे दुःख नाही पुसले
