हिरवाई नटली
हिरवाई नटली
डोंगरकपारी हिरवाई नटली,
पावसाच्या धारा जणू मोती झडली।
कधी झरा, कधी धबधबा,
मन गुंतविते हा सृष्टीचा झरा॥१॥
ढगांच्या ओढीत दरी झाकली,
धुक्याने शिखरे गूढ केली।
पावलोपावली सुगंध दरवळतो,
निसर्गाचा गंध मनात दरवतो॥२॥
रंगोबेरंगी इंद्रधनु सजले,
आकाशी आशेचे दिवे उजळले।
रस्ता नवा, स्वप्नांची वाट,
निसर्गसोबत जीवन घडवू मात॥३॥

