व्यक्त कसा होऊ
व्यक्त कसा होऊ
प्रेमाच्या विरहामध्ये अडकूनी बसलो आज मी,
वेळेच्या दोरीला तोडुनी वाट पाहतो भेटण्याची मी
मनाची आतुरता अतिशय वेगवान झाली,
देहाच्या आत्म्याला घेऊनी दूर कुठेतरी जाऊ
सांग सखे मी, व्यक्त कसा होऊ
बघितले होते मी तुला आयुष्याच्या वळणावरी,
मनात आनंद होता भविष्य विचारावरी
मला जीवनाची साथ देण्यासाठी तुझा हात लाभला,
तुझ्या त्या हाताला कष्टाची माती का लागू देऊ
सांग सखे मी, व्यक्त कसा होऊ
दिवस व्यस्त होते माझे माझ्याच विचारात,
आयुष्य चालत होते माझे माझ्याच आचारात
एकटाच धावत होतो भविष्य बदलण्यासाठी,
माझ्या सोबतीसाठी तुला हाक कशी देऊ
सांग सखे मी व्यक्त कसा होऊ
जीवनात नव्हता रस कोणता, शृंगार तू घेऊन आली
भाग्यावर नव्हता विश्वास माझा, ध्यास तू घेऊन आली
माझ्या अबोल दुःखात तुझी साथ मिळणार आहे,
तुझ्या आनंदात माझी कात मिळणार आहे
माझ्या हातावरील, तुझ्या हाताच्या गाठीला नाव कोणते देऊ,
सांग सखे मी व्यक्त कसा होऊ
जबाबदारी राहतील तुझ्या, माझ्या नजरेवरी,
साथ मिळणार ना तुझी मला, जीवनाच्या कष्टावरी
तुझ्या निरागस चेहऱ्यावर हास्य आणणारे शब्द कसे पाहू,
सांग सखे मी, व्यक्त कसा होऊ

