STORYMIRROR

Pavan Pawar

Abstract Tragedy

3  

Pavan Pawar

Abstract Tragedy

अंगाई

अंगाई

1 min
150

नीज रे बाळा तू कुशिमध्ये,

चंद्र लपला ढगामध्ये,

सूर्याचा तो भाऊ महान,

शांततेचा तह कहान, 

नीज रे बाळा तू कुशिमध्ये,

चंद्र लपला ढगामध्ये,


पार्वती बसली त्या दगडावर,

गणेश निजला निजला मांडीवर,

सुरांची कहाणी मी खेचतो,

शंकर त्यांचे पाय चेपतो,

नीज रे बाळा तू कुशिमध्ये,

चंद्र लपला ढगामध्ये,


झोपला शनी पुत्र छायेचा,

ममता जागली तिच्या मायेच्या.

त्रास सहन केला मनाने,

अपमान पाचवीला तनाने.

नीज रे बाळा तू कुशिमध्ये,

चंद्र लपला ढगामध्ये,


वैभव देवी आहे लक्ष्मी,

विष्णूप्रिया आहे ती महान,

गरीबी संपवून भागविते,

दारिद्र्याची तीच तहान.

नीज रे बाळा तू कुशिमध्ये,

चंद्र लपला ढगामध्ये,


शांत मनाचा आहे राम,

पिता विवेकशील तो महान,

तीन मातेचा प्रतिष्ठा जपली,

शब्दावर वनवासची शिक्षा भोगली.

नीज रे बाळा तू कुशीमध्ये,

चंद्र लपला ढगामध्ये.


चंचल मन आहे कृष्णाचे,

गुणी पुत्र त्या देवकीचे.

कान्हा नाव हर शिशु म्हणे,

नाव वाढविले कर्माने.

नीज रे बाळा तू कुशीमध्ये,

चंद्र लपला ढगामध्ये


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract