STORYMIRROR

Pavan Pawar

Horror Fantasy

3  

Pavan Pawar

Horror Fantasy

काय झालं घाबरला का?

काय झालं घाबरला का?

1 min
162

रात्रीच्या वेळी एकटा जात होतो.

रात्र खूप काळवळली होती,

पूर्ण रस्त्यावर काळाकुट्ट अंधार,

पण आज तर पौर्णिमा आहे ना.

काय झालं घाबरला का?


अंधारात कोण आहे तिथं,

दिसत तर काहीच नाही.

घुंगराचा आवाज ऐकू तर येत आहेत,

कुणाचे पाय आहेत जे दिसत नाही.

समोर जाऊन बघतो तर,

एकही जीव आढळत नाही.

मग कोण आहे जे नाचत आहे,

काय झालं घाबरला का?


कानावर किंकाळी आदळली,

पण कोण आहे तिथं जी हासत आहे.

कोपऱ्यात तर कुत्री रडत आहेत,

मग हासत कोण आहेत.

काय झालं घाबरला का?


समोर जात गेलो नदीवर थैमान माजला,

शांत नदीला आवाजाचा पूर आला.

नदीवर पूल तर नाही बांधला,

नदीवर चालणारी ही कोण आहे.

काय झालं घाबरला का?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Horror