STORYMIRROR

Gaurav Daware

Comedy Horror Tragedy

3  

Gaurav Daware

Comedy Horror Tragedy

हात चमत्कारी....

हात चमत्कारी....

1 min
230

मला एकदा स्वप्न पडलं थोडं भारी

मनात होता गोंधळ अन थोडया तकरारी 

स्वप्नात घडलं थोड भयानक चमत्कारी

त्या रात्री वाटलं मरण आलंय खरं दारी


स्वप्न होत छोटं पण होत अलंकारी

स्वप्नात होती मी लेटून माझ्या खाटेवरी

तेव्हड्यात थोडा खटखट आवाज आला भारी

म्हणून मी उठले अन बघितली खोली सारी


पण खोलीत नव्हतं माझ्या कोणी साक्षीदारी 

मग आवाज कशाचा आला विचारात पडले मी सारी

तेव्हड्यात मला दिसलं काहीतरी थोडं अलवारी

माझ्या खोलीतली हलत होती तुटकी आलमारी


काही क्षणातच माझे डोळे झाले मोठे थोडे भारी

कारण आलमारीतुन आले दोन हात चमत्कारी

त्या भूतांच्या हातांनी दिली मला थापड गालावरी

अन म्हणे भूत," उठ स्कूलबस आली गेटवरी"


तेवढ्यात अचानक स्वप्न तुटून गेल धुवाधारी 

कारण समोरच होती माझी आई ललकारी 

तिनेच दिली गालावर अन् थोबाड सुजवल सारी 

म्हणे आतातरी उठ नाहीत देतो लाथा कंबरेवरी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy