STORYMIRROR

Gaurav Daware

Drama Romance Fantasy

3  

Gaurav Daware

Drama Romance Fantasy

नवी सुरुवात

नवी सुरुवात

1 min
194

माझ्या स्वप्नांची झाली काही सुरुवातच भारी

झोपेत येतात पण जागवतात रात्र दिनवरी

स्वप्नात येते गोड बाहुली अन झोप उडवते सारी

पण नव्या प्रेमाच्या सुरुवातीचा मी आहे आभारी


 स्वप्नात लपलेल्या तिला आता मी शोधू कुठवरी

 नाव गाव माहित नाही पण चेहरा मात्र भारी

 शब्द एवढे गोड जणू युद्ध थांबलय क्षणभरी

 डोळे एवढे सुंदर जणू देव चित्रकारी करी


 खरंच ओठ आहेत लाल अन् गाल मात्र भारी

 सूंदरता अशी जणू गुलाब ओतलंय कोणीतरी

 शब्द आहे छोटे पण तिचा आवाज धनुर्धारी

 माझ्या हृदयात घुसून करतायेत वार प्रेमावरी 


 चेहरा आहे सुंदर आणि प्रेम होतंय वारंवारी

 अबोल समजून फसतोय मी स्वप्नांच्या दरबारी

 पण स्वप्नांच्या आशेवर सुरुवात झालीय मात्र भारी

 नव्या प्रेमाच्या सुरुवातीत मी झालो तिचा कैवारी 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama