STORYMIRROR

Bipin More

Abstract Drama Inspirational

4  

Bipin More

Abstract Drama Inspirational

मंच आणि लेखक

मंच आणि लेखक

1 min
270

आनंदाच्या डोहात मोकळ्या 

सोडली कागदी नांव 

जिथे नाही गंध मातीचा

तिथे लावले रोपं 


सुरळी केली कविता 

दिली बांधण्या भूक

वाहणे ते खरे नदीचे

चित्रात काचेच्या स्थिर 


अंधार कल्पनेचा व्हावा 

इतके उजळावे निर्मळ

आभाळ सापडेल हवेसे

मिटलेल्याही जीर्ण कोशात 


साधावे जे ध्येय जीवन

शोध तयाचा अविरत

बहरेल जिथे श्रावणमास 

भेटेल तेथेच विश्वंभर 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract