गुंतलेला माणूस
गुंतलेला माणूस
मनं शोधतं होते सकाळ
लागतं कसब रेटारेटीचं
काट्यांमध्ये अडकतो हिशोब
फुकट वजा बाकीचं
मख्ख चेहऱ्यांच्या ह्या गर्दीत
सांभाळत स्वतःला नेतो पार
आवडेल ते कमी करून.. काहीतरी मिळावं
"माणूसकी" ही थोडीफार
केवळ एकांती फुलतात सूर
अतृप्त भावनांच्या गळ्याचे
कोणाची न मागतात बरोबरी
विरागी काही आणि सुखी
काळ्या केसांत पांढरी जाळी !!
प्रश्न..."यावी का येऊ नये ?"
जगण्याचा सोस नेटाने टाळत
शर्यतीत "पळावं की टाळू नये?"
कोण कसा काय करतो
का केवळ करून काम
कर्तव्य करणाऱ्या कंत्राटासारखा
कमीत कमी किंवा काहीच काळं...
