STORYMIRROR

Bipin More

Abstract Tragedy

3  

Bipin More

Abstract Tragedy

मी पण

मी पण

1 min
18

कितीतरी काठावरून वाहत जाते 

किती किती अर्थाना सोबत घेऊन धावते

तुम्ही कुठल्या काठावरून तिला पाहता 

ओंजळं भरता किंवा मन निवड तुमची असते 


नजरेला चौकट आखलेली आहे

दिसतं नाही म्हणून माग कसा असतो

सावलीला वेळेचं आणि प्रतिबिंबाला आरशाचं

नदीला लागलीच वाहण्याचं भान ठेवावं लागतं 


प्रत्यक्ष, प्रकट हे आणि एवढंच सत्य

जगायचं ठरवलं तर नक्की समजून घ्यावं

बाकी फक्त बोलण्यातलं 

तत्वज्ञानाच्या पुस्तकात बंद होऊन राहतं


तुम्ही आम्ही जगत राहतो

दिवस उजाडला की मावळण्याची वाट बघत

नदी काय सागर काय ते ही निरूत्तर होतात

त्यांचे प्रश्न आहेत म्हणून साथ देतात


लुप्त होतात प्रवास आणि लुप्त होतात स्वप्न

राहतात त्या आठवणी उरतं नाही प्रश्न

भेदून जातो विचार मी पणाच्या चक्रातून

साठतं शहाणपण गरजेचं आणि नको पणं 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract