STORYMIRROR

Bipin More

Abstract Inspirational Others

3  

Bipin More

Abstract Inspirational Others

पानं जन्मांचं

पानं जन्मांचं

1 min
180

सोपं नसतं स्वीकारणं

कठीण असतं नाकारणं

परिस्थितीच्या विळख्यातून 

कणं कणं मोकळ होणं 


मनाच बंड चालू राहतं 

सावरण्याचं ओझं म्हणून 

धीराचा कडेलोट असतो

संधीचा सारथी होऊन 


अपघात कधी उपेक्षा कधी 

खेळ पाठशिवणीचा

फरपट कशी थांबत नाही 

उगवलेल्या क्षणांनां 


होणं असणं विरघळून जावं 

खोडून मागे लिहील्याचं

आसक्त संज्ञा परिघाच्या

उलटून पानं जन्मांचं 



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract