STORYMIRROR

Bipin More

Abstract Inspirational

3  

Bipin More

Abstract Inspirational

विठूराया माझा हक्क

विठूराया माझा हक्क

1 min
201

आज देवळात त्या काळ्याला एकटा सोडला

पाठ करून मी रागाने निरोप घेतला

निघताना नेहमीचा नमस्कार नाही तुला 

उरलंय काय म्हणूनचं तरं त्रागा केला 


नेहमीचंच तुझं मुकेपण

माझ्या प्रश्नांच्या टाचण्या

सोडून तुला अंधारात मनाच्या

मी नवा देवाऱ्हा शोधला


नवीनच देव नवीन त्याची गाथा 

नवीन त्याची भक्ती नवीन आशा

सगळं नवं करतं खूप वेळ गेला 

काहीच नव घडेना पेच जुनाच उरला 


किती बोल लावू माझा शब्द थांबला

सांग विठुराया माझा हक्क नाही संपला

तुझी आठवण नाही असा श्वास नाही घेतला

तुलाही माझा....विसर.. नाही ना पडला..??


जिथं जन्म आहे तिथेच घर आहे

जिथं मन आहे तिथेच राग आहे

या साऱ्या गोंधळात जगाच्या

तुझाच पदर हवाय मला...हट्टाने जगायला...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract