बंद दारं
बंद दारं
दाराशी येऊन थांबली
थांबली पावलं चालणारी
आत काहीशी शोधत होती
गाभाऱ्यातल्या सावलीची
बंद दाराची सवय सारखी
जशी ओळख बंद मनांची
समजूनही वाट पाहीली
संगमावरच्या सांजेची
आक्रंदन शिणले होते
जशी शांतता गंभीरता
काळोख जेव्हा भरून वाहिला
तेव्हा वळली दाराला
अखेरचा यत्न करावा
जाऊन शरण दाराला
उघडली जर कधी अचानक
मग उजळेल माझिया जन्माला
