वळण
वळण
प्रवासात सोबत हवी
प्रवाहा सारखी नसली तरी
गतीशी मैत्री व्हावी
दिशा भरकटली तरी
एका वाटेचे किती कोपरे
वेचून पाहावे रोज
एकाच जगाची ओळख असते
खांदे पालटून सहज
वळणं इतकी सुंदर
दोन्ही युगांचा संगम
अनुभवांचा गंध केवडा
बहरण्याची आर्त चाहूल
वळणांनी ध्यास घ्यावा
परमेशाचा हात असावा
उजाडल्या सूक्ष्म साधनी
प्रकाशात वाट हरवावी
