STORYMIRROR

Prashant Shinde

Abstract

4  

Prashant Shinde

Abstract

एक आठवण...!

एक आठवण...!

1 min
255

एक आठवण म्हणता म्हणता

अनेक आठवणी दाटून आल्या

प्रेमापासून ध्येय्यापर्यंत साऱ्या

आपोआप जागृत झाल्या...


त्यात एकच आठवण

गुरूस्थानाची मनास चाटून गेली

म्हणून त्याच मळ्यातील उंबराची

आठवण कथन करावी वाटली.!


मळ्यातला उंबर.!

मळ्यातला उंबर

मनात घर करून आहे

दत्त दत्त म्हणूनच

तो हृदयी वास करून आहे...


लहानपणापासून

अनेक भावना जडलेला

एक वेगळंच भक्तीचं

मनात घर करून राहिलेला.


मोजक्याच फांद्या

मोजकीच पानं

न सुटणार कोडं

अडवत होत सदा घोडं...


वाटायचं सारख मनात

हा एवढा मोठा वृक्ष

पण असा रोडका का?

इतका रडका का?


एक दिवस कोडं उलगडलं

हऱ्याचं जेंव्हा फांदीवर दर्शन झालं

ज्यांन वर्षानुवर्षं त्याला

बेमालूम पणे रोडक बनवलं...


शेळ्यांसाठी पाला हा

नियमित फांद्या तोडून काढायचा

जणू आमच्या भक्तीलाच

नकळत चाप लावायचा...


काळजी पोटात घर करू लागली

त्याच्या जीवाची पर्वा वाटू लागली

शेवटी दत्त गुरूंना नमस्कार केला

आणि वृक्षचं बांधावरून काढला...


आजही तो आठवतो

डोळ्यात पाणी साठवतो

पण आशीर्वाद मनापासून

स्वप्नात येऊन नियमित देतो.


त्याच्या फळांनी लगडलेल्या खोडाला

पाहून माया भक्ती दाटून येते

त्या झाडाच्या निमित्ताने

हऱ्याची आठवण मात्र आजही होते.!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract