राष्ट्रीय गणित दिन
राष्ट्रीय गणित दिन
22 डिसेंम्बर राष्ट्रीय गणित दिन...!
अंकांशी खेळता खेळता
सारे जीवन सरले
अंक सारे
हळू हळू विरले
एक एक करीत
पाने गळून पडली
उलटी गिणती
पुन्हा सुरू झाली
अंक ज्यांनी दिले
ते सर्व लयास गेले
अंक मात्र त्यांनी
चिरंजीव केले
त्या सर्व गणितींना
मानाचा मुजरा
केला मी उशीराच
गणित सुटता दिन साजरा
वेळेचे गणित मोठ्ठे
सुटता कधी सुटत नाही
भेटण्यास आता
वेळच मिळत नाही
म्हणुनी संकल्प आज केला
जरी वेळ वाया गेला
चोवीस तासांच्या गणितात
माझ्या साठी वेळ मी हा दिला
म्हंटले जन्म आपला
गड्या आपल्याच साठी आहे
गणित कसले घालतोस वेड्या
वेळ माझ्या साठीच सर्व आहे
सुटले गणित क्षणात
बळ वाढले मणात
संचारले तेज अंतरात
घेतले विश्व मी उदरात....!