पोरीचा जलम
पोरीचा जलम
नित पोरीचा जलम
घरदार सुलावणं
जीवीचं रे खुलावणं
ईसरतं दमावणं
लखलखतं चांदणं
चमचम चकाकणं
झरझर झिरपणं
पोरीचं गं असणं
पोर काळीज बापाचं
पोर हिरद मायचं
मोल ठेवा हो जगती
अशी सानुली पणती
लाडे रुसणं हसणं
हर्षाची गं रुणझुण
जीवास या जीवन
घरा देई घरपण
ती पिढीचं रुजवणं
तीच सृष्टीचा उगम
जणू संजीवनी प्राण
चराचराची गं शान
तिज करूया जतन
जसे मायेचे रतन
तीच सार नरजन्मा
उभी टाळण्या पतन