STORYMIRROR

Latika Choudhary

Others

3  

Latika Choudhary

Others

वसुंधरा

वसुंधरा

1 min
236

चैत्र वैशाखाच्या सूर्याच्या संतापानं 

तापानं होता कहर वसुंधरेवर

अंगावरची गवत पाती तण 

पाला पाचोळा झुडुपं

प्रखर उन्हानं वातड होत

वाळत सुकत मरत जातात


हळूहळू

होते लाहीलाही तगमग

मानव प्राणी जीव जंतू

जीवाची

भुई भेगाळते तापते 

तडकते छिन्नविच्छिन्न

होते मनातून देहातून-

पिळवटून घेतलं जातं    

               

रक्त पाणी प्राणतत्व जणू

भुईच्या नसानसातून

धरणी होते मलूल निद्रिस्त

ध्यानस्थ काही काळ-

नांगरणी वखरणीचे टाळ न्

जिव्हाळ्याचा फिरता फाळ

उघडते डोळे खाडकन

पाहते तिच तिचं रूप


सकवार साजरं तुकतुकीत चकचकीत

नव्या नवतीतलं मोहक आकर्षक-

होतं पुनर्जीवित तिचं सौंदर्य, शक्ती

किमया नवनिर्मितीची दावत            

करते साजरा सोहळा

सृजनोत्सव हिरवाईचा 

नव-नवेली तरण्याबांड तरूणीगत !


साहित्याला गुण द्या
लॉग इन