सृजन
सृजन
1 min
14.4K
विचारांचे जलचर
मन अथांग सागर
तरंगती डोही
नयनांच्या ।।
विरघळती आसवे
लाचारे जल साचवे
आटवूनी देही
भावनेच्या ।।
रासरंग नियतीचा
भाळी टाक सटवीचा
खेळवी जीवना
मनुजाच्या ।।
देहाची या सोशिकता
मनाची या महानता
गावली शिदोरी
जल्माच्या ।।
जग असे मायाजाल
रक्तनाती मृगजळ
क्षणी काढी पळ
संकटाच्या ।।
सृजनाचा असा छंद
अवखळ मनी बंध
तारी प्रलयात
जीवनाच्या ।।
