STORYMIRROR

Vanita Shinde

Action

3  

Vanita Shinde

Action

झेप तिच्या कतृत्वाची

झेप तिच्या कतृत्वाची

1 min
28.1K


ध्यास मनीचा करण्या पुर्ण

ओलांडली शिखरे संघर्षाची.

गगनाला जाऊन भिडली

झेप तिच्या कर्तृत्वाची..

हताशपणे फिरून माघारी

ना कधीही हरली नारी.

निर्भिड होऊन करत स्वारी

चढली ती यशाची पायरी..

शुन्यातून केली निर्मिती 

मोहक सुंदर विश्वाची.

प्रयत्नांना देऊन आकार

मुर्ती स्थापली यशाची..

झेप घेण्या कर्तृत्वाची

मारली उंच गरुड भरारी.

सर्वच क्षेत्रात पुरुषांसम

तळमळीने झाली करारी..

तिच्या कर्तृत्वापुढे नमले

धरती ,आकाश अन पाणी..

सर्व ठिकाणी उभी ठाकली

शुर, वीर, संस्कारी मर्दानी..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action