STORYMIRROR

Vinod Nikam

Inspirational Action

4  

Vinod Nikam

Inspirational Action

प्रश्न निसर्गाचे

प्रश्न निसर्गाचे

1 min
41.8K


झाड पाडले घरटे तूटले पाखराने जावे कुठे 

उध्वस्त जीवनाची फिर्याद मांडावी कुठे ?

 

सम्रृद्धिच्या मार्गासाठी अस्तित्व जिचे संपले

त्या हिरव्या टेकडीचे स्मारक बांधले कुठे 

 

पारदर्शी नदी झाली कुष्ठमंडित दुर्गंध नाला 

जलौघाचा खळाळता नाद सांग ना विरला कुठे

 

जलचरांचा प्राण घूसमटे दूषित जीवनातूनि 

परिकथेतील जलपरि ती सांग ना गेली कुठे 

 

प्राणवायू दूषित सारा प्राण कंठाशी घुसमटे

स्वच्छंद स्निग्ध मूक्त पवन वर्तमानी गेला कुठे 

 

मानवाची भूक मोठी स्वाहा झाली अवघी अवनी  

येणा‌-या पिढ्यांसाठी उरली हरित वने कुठे 

 

हिरवी संपदा लूटूनि ज्यांनी स्वर्ग साती बांधले 

निसर्गाच्या हत्यारींना शिक्षा अजूनि झाली कुठे 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational