STORYMIRROR

Vikas Rathod

Inspirational

4  

Vikas Rathod

Inspirational

उतरंडीच एक मडकं

उतरंडीच एक मडकं

1 min
41.5K


उतरंडीच एक मडकं मी आज फोडलं

मी तुझ्या आभाळाखाली राहणं सोडलं...


धुसमुसते गगनात एक पाखरू

जागा घरट्याची आता शोधली पाहिजे...


कैकदा बुडबुडतात व्यर्थ शंका 

काढले पाहिजे मनाला पोखरून आता...


पिंजऱ्यात कैद झाली रानपाखरे

आता पिंजराच अख्खा फडफडतो आहे...


मी चालतो घेऊन सोबती उन्हाला

मला सावली हल्ली चटके देत असते...


मी पेरतो एकएक बीज दीपांचे 

प्रकाश सगळीकडे उगवला पाहिजे ...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational