किती लांब आहेत अजून...
किती लांब आहेत अजून...


किती लांब आहेत अजून किनारे
माझी होडी आता बुडते आहे ...
मी कधीचा थेंबथेंब साचतो आहे
बांध काळजाचे आता फुटलेत सारे...
श्वास रथावर स्वार आहेत
मृत्यू त्याचा सारथी असताना...
अरे कसली आग उरात पाहिजे
देह सरणावर जळतो आहे...