महाराष्ट्र ( अभंग रचना )
महाराष्ट्र ( अभंग रचना )


राज्याचे दैवत I तलवार रणी I
ते मुकुटमणी I शिवराय ॥१॥
शिवजयंतीला I सुरुवात केली ॥
मनी रुजवली | ज्योतीबाने ॥२॥
मोफत शिक्षण I देती आरक्षण I
जिंकी प्रजा मन I शाहुराजे ॥३॥
बाबासाहेबांनी | दिली समानता ॥
जगती भारता | संविधान ॥ ४॥
पृथ्वी तरलेय | कामगारा हाती ॥
आण्णाभाऊ देती | प्रगल्भता ॥५॥
पृथ्वीवर गोड | हृदयास भिडते ॥
सर्वां आवडते I ही मराठी ॥६॥
सदा अग्रेसर | खजीना रत्नांचा॥
मान हा देशाचा I महाराष्ट्र ॥७॥