राज्य( अभंग रचना )
राज्य( अभंग रचना )
जम्बुद्वीपी असे । बुद्धांचे ते राज्य ।
तेच हो सुराज्य । शांततेचे ॥ १ ॥
किती राज्यकर्ते । आले आणि गेले ।
अस्तीत्व राहीले । तथागता ॥ २ ॥
शांतीचा संदेश । ज्याने स्विकारला ।
प्रगती मार्गाला । त्याचे राज्य ॥ ३ ॥
स्वतंत्र भारती । संविधान आले ।
लोकशाही झाले । राज्य सारे ॥ ४ ॥
किशोर वाटते। असे राज्य यावे ।
सुखात राहावे । देशवासी ॥ ५ ॥