हिवाळा (सहाक्षरी)
हिवाळा (सहाक्षरी)


थंडीची चाहूल
हुडहुडी भरी
शेकोटी पेटवा
आपल्याच दारी
बोरं पेरु फळं
पटकन खावी
सर्दी खोकल्याची
तमा ना करावी
व्यायाम आहार
भरपूर घ्यावा
सुदृढ शरीर
अनमोल ठेवा
आवडे हिवाळा
सदाच सर्वांना
उत्साह उमेद
कमी ती होईना
स्वागत ऋतूचे
मिळून करूया
चला पुढे होवू
मजेत जगूया