STORYMIRROR

Sujata Kale

Others

4  

Sujata Kale

Others

मी वाट.....!!

मी वाट.....!!

1 min
472

मी वाट आहे

थांबत नाही कधी

संपत ही नाही कधी

मी वाट आहे...


कुणाची ही वाट

पाहत नाही कधी

अनंतापर्यंत जाणारी

मी वाट आहे...


काट्याकुट्यातून जाणारी

फुला मनातून जाणारी

मोक्ष मिळवून देणारी

मी वाट आहे....


मला वाट नाही दिली

तरी वाट करून जाणारी

स्वतःची वाट स्वतः शोधणारी

मी वाट आहे......


मी मुकलेल्यांना आणि

मी चुकलेल्यांना पण

वाट दाखवणारी

मी वाट आहे...


साहित्याला गुण द्या
लॉग इन