जीव ताटवा फुलांचा
जीव ताटवा फुलांचा
कधी दूर
ताटवा फुलांचा,
माझ्या संगतीला येतो
कधी दूर
ताटवा चांदण्यांचा,
राती संगतीला राहतो
कधी रात
राहते संगतीस,
तव आठवांचा पूर येतो
कधी आठवणींच्या
हिंदोळ्यावर सूर,
डोळ्यांतून येतो
कधी सूर
आळवी-आर्जवी,
उर हळाळून येतो
कधी जीव
आठवांच्या ताटव्यात,
चांदणेच होतो

