STORYMIRROR

Sujata Kale

Tragedy

3  

Sujata Kale

Tragedy

कसं म्हणु बाबा तुम्ही मने

कसं म्हणु बाबा तुम्ही मने

1 min
356

घर स्वच्छ केली तुम्ही गावे स्वच्छ केली

डोळे उघडे लोकांचे पण अंर्तमनाची नजर मात्र मेली .

जिथे– तिथे मानव मनाने अस्वच्छता केली

आणि कसं म्हणु गाडगेबाबा तुम्ही मने स्वच्छ केली .. . .. . .

स्वच्छतेच्या पुरस्काराने गावे सम्मानित केली पण

मंत्र काय- तंत्र, काय करणी- काय अन् जादू काय

धागा– दोरा- गंडयामधे समाज बांधुन राहिलाय

लोकांनी अंधश्रद्धा कळसावर नेली

आणि कसं म्हणु बाबा तुम्ही मने स्वच्छ केली .. . .. . .

गुप्तधन शोधण्यासाठी अजुन देतात बळी

‘ती’ घराण्याला वारस नको म्हणुन मारून टाकतात मुली

देशाची एकच ‘कल्पना’ काय ती अंतराळात गेली

आणि कसं म्हणु बाबा तुम्ही मने स्वच्छ केली .. . .. . .

घरावर छप्पर नसेल तर लोक किव किव करतात

स्त्रियांवर छप्पर नसेल तर लोक काव काव करतात

किती तरी निर्भयांची अब्रु चव्हाटयावर गेली

आणि कसं म्हणु बाबा तुम्ही मने स्वच्छ केली .. . .. . .

आरक्षणाचा लढा चाललाय सैनिक धारातिर्थी पडतोय

विकासलेला समाज जाती भेदाभेद करतोय

लोकांची मानसिकता किती खालावून गेली

आणि कसं म्हणु बाबा तुम्ही मने स्वच्छ केली .. . .. . .

घासातला घास तुम्ही भुकेल्यांना वाढलात

पार्टीच्या पाटर्या इथे राजरोसपणे रंगतात

अन्नपूर्णची रया इथं ताटातून वाया गेली

आणि कसं म्हणु बाबा तुम्ही मने स्वच्छ केली .. . .. . . 

देश जागा झाला स्वातंत्र्याने सत्तरी कधीच ओलांडली

चंद्र – मंगळा वर आपाली याने सुद्धा पोहचली

आमची मात्र वाहने गटारी करत थांबली 

आणि कसं म्हणु बाबा तुम्ही मने स्वच्छ केली .. . .. . .

Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy