STORYMIRROR

Sujata Kale

Others

3  

Sujata Kale

Others

अंगाराची साथ तुला...

अंगाराची साथ तुला...

1 min
187

कोण हरतो ! कोण जिंकतो!

इथे कुणाची खंत कुणा,

जो धडपडतो, जो कळवळतो,

रोजच पडतो ही खंत मना..

     अंगाराची साथ तुला...


अंधारातून दिशा काढ तू,

हाच मानवा संदेश तुला,

हृदयातून पेटव मशाल तू,

मार्ग दाखवी रोज तुला..

    अंगाराची साथ तुला...


वादळात जरी पडले घरटे,

जोमाने तू बांध पुन्हा,

थरथरणारे हात ही दबतील,

दगडाखालुन काढ जरा..

     अंगाराची साथ तुला...


सूर्य सोबती नसो तुझ्या,

ना चंद्र सोबती दिमतीला,

काजव्याची माळ ओवून,

बांध तुझ्या तू भाळाला...

     अंगाराची साथ तुला...


लखलखणारा तारा नसू दे,

नशीब तारा चमकव ना,

वसंतातल्या रंग छटा या,

पानगळीत ही पसरव ना...

     अंगाराची साथ तुला...


वितळूनी पोलाद स्वतःस बनव तू,

अंगाराची साथ तुला,

ढाल नसू दे चिलखताची,

छाती मधूनी श्वास हवा..

     अंगाराची साथ तुला...


Rate this content
Log in